न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटात संध्याकाळपासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.
आज सकाळ पासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. साडेचारच्या सुमारास ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
या अवकाळी पावसाचा फटका मावळ भागातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, शेतमालाचे आणि पिकाचे मोठे नुकसान झालं असल्याची भिती व्यक्त होत आहे.















