न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ६ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरातील नागरिकांना आणि आम्हा विद्यार्थ्यांना खरे आमदार कोण हे ओळखणे अवघड जात आहे. गाडीवर आमदार असे स्टिकर आणि काळ्या काचा लावून शेकडो गाड्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या थाटात फिरत आहेत परंतु त्यांचेवर कारवाई होताना दिसत नाही.
पिंपरी चिंचवड शहरात असणारे लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य यांच्या अधिकृत वाहनांचे नंबर पिंपरी चिंचवड करांसाठी जाहिर करावेत. जेणेकरून खऱ्या आमदार महोदयांची गाडी ओळखणे सोपे होईल.
ज्या खोट्या आमदारांनी गाडीवर अनधिकृत स्टिकर लावले गेले आहे, अशांवर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे सदस्य रविराज काळे यांनी शहर पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्याकडे ईमेलद्वारे केली आहे.















