न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२३) :- निगडीतील स्वरा म्युझीकल्सच्या वतीने गोल्डन डयुट्स हा लोकप्रिय मराठी व हिंदी युगुल गीतांचा कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी एकाहून एक सरस गाण्यांचे उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना स्वरा म्युझिकल्स, निगडीच्या अॅड. शोभा कदम यांची होती. त्याच्या संकल्पनेतील हा पहीलाच कार्यक्रम व त्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यक्रमात पुण्याचे प्रसिद्ध गायक गफारभाई मोमिन, रविंद्र शाळू व गौरी कडुसकर यांचे विशेष सहभाग होता. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे गायक कलाकार संजय खटावकर, विनायक घोरपडे, प्रज्ञा गौरकर, रविंद्र हिरेमठ, व शोभा कदम यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमात ७० ते ९० च्या दशकातील वादा तो निभाया, कितना प्यारा बादा, मेघा रे मेघा, मार गई मुझे तेरी जुदाई, हर किसीको नही मिलता यहाँ प्यार जिंदगी मे, सजनी ग भुललो मी, देखा एक ख्वाब तो, एक लाजरा न साजरा मुखडा, परदेशीया, ले जाऐंगे, तसेच सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेले बहरला हा मधुमास नवा, तसेच प्रेक्षकांच्या आग्रहाखातर घेतलेल्या झिंगाट अशा विविध लोकप्रीय गीतानी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमांचे सुत्रचसंचालन आकाश सोळंकी यांनी केले तर ध्वनी व्यवस्थापन व व्हीडीओ हेमंत उल्लेकर यांचे तर गफार मोमीन यांचे उत्कृष्ट हिन्दुअल्स चा समावेश होता. तसेच कार्यक्रमासाठीची जाहीरात, फोटो व्यवस्थापन नागन्ना झलकी यांनी केले व आभार स्वरा म्युझीकल्स च्या अॅड.शोभा कदम यांनी केले.