न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- मेशो अॅपवरील पाठीमागील रक्कम परत घेण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या कस्टमर केअरला फोन केला. त्यांनी फिर्यादी यांचा फोन वरीष्ठ कार्यालयाकडे वळविल्यानंतर तेथील अनोळखी इसमाने फिर्यादी यांना एक रस्कडेस्क नावाचा रिफंड सर्व्हिस अॅप डाऊनलोड करण्यास सांगुन त्यातील रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करण्यास लावली.
त्यामुळे फिर्यादी यांची एकुण रक्कम रुपये १,५०,००० आणि मोबीक्वीक अॅपमधुन रक्कम रुपये ७,००० ची ऑनलाईन आर्थीक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. ७) रोजी ११.५५ वाजताच्या दरम्यान पिंपळे सौदागर येथे घडला.
महीला फिर्यादीने मेशो अॅपवरील अनोळखी इसम त्याचे पुर्ण नांव, पत्ता माहीती नाही याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २३१/२०२३, भा.दं.वि. कलम ४०६,४२० सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.