न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवरुन फिर्यादी यांना फोन व व्हॉट्सअप कॉल केला. आरोपीने लग्नाचे आमीष दाखऊन ‘तुला सोने, आयफोन व परदेशी चलन इंग्लंडहून बॅगमध्ये पार्सल पाठवून देतो’, असे सांगितले.
त्याकरीता फिर्यादीकडून कस्टम ड्युटी, परदेशी चलन कन्वर्ट व भारतीय कर भरण्यास एकूण रक्कम रुपये ७,९७,७०० रुपये ऑनलाईन पध्दतीने घेऊन त्या वस्तू न देता फिर्यादीची फसवणुक केली. हा प्रकार (दि. ८ व दि. ९) रोजी कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर येथे घडला.
महिला फिर्यादी यांनी आरोपी निखील जोशी (इग्लंड), त्याची एक महीला साथीदार (तिचे नांव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २३०/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६,४२०, ३४ सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.