न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२३) :- जिममध्ये फिर्यादीचा मुलगा सायकलवर पोहण्यास गेला होता. तो परत घरी येत असताना त्याला डंपरवरील चालकाने धडक दिली. आरोपी चालकाने डंपर बेदकारपणे, हयगईने चालवला. अपघातात फिर्यादीचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा अपघात (दि. ३०) रोजी सकाळी १०.०० च्या सुमारास चव्हाण इस्टेटसमोर, आहेरवाडी चौकाजवळ, चिखली येथे घडला. फिर्यादी प्रदिप अशोक निकम यांनी आरोपी डंपर चालक ज्ञानदेव गोपाळ पवार याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ३६०/२०२३ भा.दं.वि. कलम २७९,३३८,३०४ (अ) मो.वा. कायदा कलम १८४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.