न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- सलग चौथ्या दिवशी विजांच्या कडकडाटात शहराला जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. दापोडीसह काही ठिकाणी गारांच्या पाऊस झाला. तर कासारवाडीत वादळी पावसाने झाड उन्मळून पडले. बोपखेलमधील गणेशनगरमध्ये बाभळीचे झाड कोसळुन स्कार्पियो वाहनाचे व दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना गारवा मिळाला. शहरात गेल्या चार दिवसांपासून ठिकठिकाणी गारांसह पाऊस कोसळत आहे.
बुधवारी रावेत, देहूरोड परिसरात सायंकाळी तासभर गारांसह अवकाळी पाऊस कोसळला. तर, आज गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी शहराच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. दापोडी परिसरात गारांचा पाऊस झाला.












