न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२३) :- सार्वजनिक जागेत टोळक्याने मोठमोठयाने आरडाओरडा केला. गोंधळ करुन शांतततेचा भंग केला. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनात २ हॉकीची स्टीक आढळून आले. ही घटना (दि. ३०) रोजी रात्री ९.३० च्या सुमारास साई बाजार सुपर मार्केट, विजय नगर, लेन नं ५ दिघी येथे घडली.
पोलिसांनी आरोपी ताबीश मोहम्मद अली शेख, दत्तात्रय संजय कदम, शुभम विनोद खत्री, ऋषीकेश रविंद्र दळवी, जुबेर जाकीर खान यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात २३८/२०२३भा.द.वि. कलम १४३, १४४, १४५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींना पोलिसांनी सी आर पी सी ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस दिली आहे.