न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- लावलेले होर्डींग वादळी वा-याच्या पावसामुळे टायर ऑन व्हिल या दुकानावर कोसळले. त्यावेळी तिथे हजर असणारी लोक किरकोळ जखमी झाली. होर्डींग मालकाने मानवी सुरक्षीततेस धोका निर्माण होईल अशा पध्दतीने होर्डींग उभे केले.
हा अपघात (दि. ३०/०५/२०२३) रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास विब्ग्योर स्कूलशेजारी, हिंजवडी येथे घडला. फिर्यादी सिध्दार्थ श्रीकांत देवबागकर यांनी आरोपी संजय दुधाणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ६०२/२०२३ भादवि कलम ३३७,४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


















