न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- ऑफिसमधील कॅम्युटर हॅक केला. आरोपीने त्याचा मेल आय. डी. फिर्यादीला पाठवला. जबरदस्तीने संपर्क करण्यास सांगितले.
” कॅम्युटर फोल्डरमध्ये एक फाईल मॅसेज सेव केलेला असून जर संपर्क केला नाही, तर तुमचा डाटा तुम्हास मिळणार नाही. तुम्हाला जर माझ्यावर खात्री नसेल तर एक फाईल आम्ही ओपन करुन देवु, ती आमची गॅरंटी आहे. तुम्ही जर आम्हास सहकार्य नाही केले, तुमचा सर्व डाटा तुम्हास भेटणार नाही”, असा धमकीचा मेसेज फाईलद्वारे पाठवला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २८/०५/२०२३) रोजी सकाळी १०.०० वाजता प्रनव इंटरप्राईजस, वाकड येथील कन्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये घडला. फिर्यादी जितेंद्र दिलीप चौधरी यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ६७१ /२०२३ भा.द.वि. कलम ५०६ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















