न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये करण्यात येते. शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती, कार्यक्रम केले जातात.
हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपल्याला जाणीव व दृष्टीकोन देतो. या सर्व गोष्टी विचारात घेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग विविध ठिकाणी सकाळी ९.०० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत आहे.
क्षेत्रीय कार्यालय वृक्षारोपण ठिकाणे :-
१) अ क्षेत्रीय कार्यालय- बर्ड व्हॅली उद्यानासमोरचा रस्ता आणि संत ज्ञानेश्वर उद्यान
२) ब क्षेत्रीय कार्यालय- रावेत रोड म्हस्के वस्ती रस्ता
३) क क्षेत्रीय कार्यालय – बोराडे वाडी मोशी प्रधान मंत्री आवास योजना
४) ड क्षेत्रीय कार्यालय – ड क्षेत्रीय कार्यालयासमोर
५) ई क्षेत्रीय कार्यालय – जलतरण तलाव वडमुखवाडी
६) फ क्षेत्रीय कार्यालय – देहूरोड मिलटरी हद्द
७) ग क्षेत्रीय कार्यालय – थेरगाव बोट क्लब
८) ह क्षेत्रीय कार्यालय – पर्यावरण संस्कार केंद्र
सर्व शहरवासीयांनी या मोहिमेत सहभागी होवून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा आणि आपले पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


















