न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- २०२० मध्ये पतीच्या उपचारासाठी फिर्यादी महिलेने आरोपी चुलत दिराकडून १,००,००० रुपयांची मदत घेतली होती. ते पैसे फिर्यादी या आरोपीस परत देऊ शकल्या नाहीत.
त्याचा गैरफायदा घेऊन सुमारे चार महिन्यांपासुन ते आजपर्यंत आरोपीने फिर्यादीचा गैर फायदा घेतला. त्यांना खरेदीच्या बहाण्याने लॉजवर नेऊन त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्ती करीत वारंवार शाररिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सुमारे ४ महिन्यापासुन ते आत्तापर्यंत ताथवडे येथील लॉजवर घडला. महिला फिर्यादीने आरोपी माणिक मारुती विधाटे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५३६/२०२३ भादंवि कलम ३७६ (२) एन प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
















