न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी चिंचवड येथे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजूर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते.
शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेचा कोरम पूर्ण झाल्यावर पतसंस्थेचे सचिव वैभव देवकर यांनी सभासदांसमोर विषयांचे वाचन केले व सदर विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. यामध्ये पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के दराप्रमाणे लाभांश मंजूर करण्यात आला तसेच सेवानिवृत्त व सलग २५ वर्ष पतसंस्थेचे सभासद असणाऱ्या सभासदांना रक्कम रुपये पाच हजार रुपये बक्षीस म्हणून अदा करण्यात आले. तसेच या सभासदांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व सभासदांच्या गुणवंत पाल्यांना व राज्यस्तरीय खेळाडूंना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेचे चेअरमन सनी कदम, व्हा.चेअरमन अनिल लखन, सचिव वैभव देवकर, खजिनदार विजया कांबळे व संचालक चारुशीला जोशी, नथा मातेरे, विशाल भुजबळ, शिवाजी येळवंडे, विश्वनाथ लांडगे, कृष्णा पारगे, संदीप कापसे, विजय नलावडे, धर्मेंद्र शिंदे, संजय कापसे, नंदकुमार इंदलकर, लाला गाडे, उमेश बांदल, मंगेश कलापुरे, विशाल बाणेकर, चंद्रशेखर गावडे, तुषार कस्पटे, सुरज टिंगरे, दत्तात्रय ढगे, प्रमोद अंबपकर, मदन चिंचवडे किसन आरजे, देवराम जगदाळे, सुहास ताकवले आदी उपस्थित होते. तसेच पतसंस्थेचे चेअरमन सनी कदम यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले.












