न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- मावळच्या उपविभागीय अधिकारी पदी (प्रांत) सुरेंद्र नवले यांची नियुक्ती, तर वडगावचे तत्कालीन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची नागपूरला झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली. त्यांची कुळ कायदा शाखा पुणे येथे बदली झाली.
मावळचे प्रांत संदेश शिर्के यांची रायगड उपजिल्हाधिकारी म्हणून एक महिन्यापूर्वी बदली झाली. त्यानंतर सुभाष भागडे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार होता. गेल्या दोन महिन्यांपासून या पदासाठी मोठी रस्सीखेच चालू होती.
मावळ प्रांत हे अतिमहत्वाचे पदाधिकारी असल्याने अधिका-यांच्या मुंबई वा-या सुरू होत्या. दररोज एकाचे नाव चर्चेत होते. शिर्के यांची बदली झाल्यानंतरही एक महिना कुणाची वर्णी लागली नव्हती. अखेर सुरेंद्र नवले यांची पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.












