न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा महाविद्याल व ज्यूनिअर कॉलेजमधील विद्यार्थी, प्राध्यापकांनी आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कॉलेजच्या विद्यार्थी व प्राध्यापकानी सहभाग घेऊन वारकऱ्यांना खाऊ वाटप केला.
आकुर्डी ते चिंचवड स्टेशन, पिंपरीपर्यत दिंडी सोबत पायी चालण्याचा आनंद घेतला. पहाटे पाच वाजल्यापासून ते साडे सातपर्यंत विद्यार्थी व प्राध्यापक या दिंडी मध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय करत असते.
कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉं क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्टुडंट्स वेलफेअर व सोशल ऍक्टिव्हिटी कमिटी अंतर्गत प्रा.अर्चना गांगड, राष्ट्रीय सेवा योजनाच्या प्रमुख प्रा आश्लेषा देवळे, प्रा कुंभार, यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम व्यवस्थित पार पडला. संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांनी प्रोत्साहन दिले.












