न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- सरकारी रेशनिंगचा तांदुळ हा पॉलिथिन बॅगमध्ये भरून छुप्या पद्धतीने दोन ट्रकमधून खुल्या बाजारात बेकायदेशीरपणे विक्री करण्याकरता आरोपी जात होते. शिरगाव परंदवडी पोलीसांना याची माहिती मिळाली. त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाका समोरील मुंबई बाजुकडे जाणाऱ्या लेनवरती सापळा रचुन अतिशय शिताफिने दोन ट्रक ताब्यात घेतले.
ट्रकची पाहणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये सरकारमान्य ३५ टन (३५००० किलो) तांदुळ बेकायदेशीररित्या विक्री करता वाहुन नेत असताना मिळुन आला आहे. याबाबत तहसिल कार्यालय, मावळ येथिल पुरवठा अधिकारी यांनी सदर ठिकाणावरील पंचनामा केला. सदर गुन्हयामध्ये एकुण २७,६२,४३७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन गुन्हयामध्ये आरोपीना अटक केली आहे. त्यांच्यावर शिरगाव पोलीस ठाण्यात १६४ / २०२३ अत्याआवश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
राजु नागनाथ केंद्र, अमोल लक्ष्मण सोळसकर, सचिन वसंत धुमाळ, संजय शिवलिंग वाघोलीकर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करत असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव परंदवडी पो.स्टे. वनिता एस धुमाळ, पोहवा / ४७१ टी.सी. साबळे, पोना / १२३१ एस. बी. घाडगे, पोना/१२५० वाय. जे. नागरगोजे, पोअंम / २२४१ एस. एल. फडतरे व पोअंम / २५७६ डी व्ही राठोड यांनी केलेली आहे.