न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- ‘शस्त्र परवाना काढून देतो’ असे ओळखीच्या आरोपी व्यक्तींनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीच्या भावाच्या मुलांच्या शस्त्र परवान्यासाठी एकुण ३५,००,००० रुपये बँक व रोख स्वरुपात घेतले.
शस्त्र परवान्याचे कोणतेही काम न करता तसेच घेतलेले पैसे परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक करुन पैशांचा अपहार केला आहे. हा प्रकार मे २०२० मध्ये बावधन, पुणे या ठिकाणी घडला.
फिर्यादी मनोहर आबुराव दगडे यांनी राज ऊर्फ धनराज बाळु गायकवाड, महिला आरोपी, मेघराज गायकवाड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी तिघांच्या विरोधात ७३८ / २०२३ भा.दं.वि कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.