न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- पतंजली योग समिती व शहर भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या सहकार्याने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इंद्रायणी नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयदीप करपे सुभाष नेवसे प्रसाद देशमुख, प्रशांत रासकर, सचिन तेलोरे, विठ्ठल नवाने ,प्रशांत देशपांडे, पंढरीनाथ घोडके ,कृष्णा तावरे, दादा वाघचौरे, जावळे काका, विजय गोरडे, संजय मांजरे, शंकर मेमाणे,अशोक भोर, परशुराम बांगर बबन वाडेकर बालाजी ढगे,मच्छिंद्र मगर,रामदास जैद, बाळशीराम बांगर ,बबन वाडेकर, मधुकर चव्हाण, स्वामी,बालाजी ढगे, मारुती इंगळे, अमृत पांचाळ,पुष्पा इंगळे सुमन गावडे, रेश्मा करपे, शौर्य करपे आदी उपस्थित होते.
प्रभागातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. गार्डन गृप भोसरीचे संजय राहणे व योग शिक्षक गुरुदास पाटील, दिलीप जाधव, चंद्रकांत गावडे व कांतीलाल करपे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
सूत्रसंचालन दीपक सोनवणे यांनी केले.














