न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यातील यशस्वी संस्थेनेसुद्धा योग प्रात्यक्षिक सत्राचे आयोजन केले होते.
संस्थेच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ‘चेअर योगा’ प्रक्राराद्वारे कार्यालयीन कामकाज करताना देखील थोडासा वेळ काढून योगाद्वारे स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल यादृष्टीने खुर्चीत बसून कोणकोणते योगासनाचे प्रकार सहजगत्या करता येऊ शकतात हे प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेतले.
तसेच संस्थेच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर व हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग स्किल सेंटरच्या विद्यार्थ्यांनी व प्रशिक्षकांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. तर संस्थेच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मधील विद्यार्थी व प्राध्यापकांनी देखील योगासनांचे विविध प्रकार सादर करीत योग दिन उत्साहात साजरा केला.














