- जागतिक योगा दिनानिमित्त योगा शिबिर..
- महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातला सशक्त भारत घडविण्यासाठी सर्वांनी योगा करणे गरजेचे आहे. दैनंदीन जीवनात ताणतणाव येत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी योग करणे हा एकमेव मार्ग असल्याचा विश्वास भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी व्यक्त केला.
जागतिक योग दिनानिमित्त निगडी प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानात अनुप मोरे सोशल ऍण्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या वतीने आज बुधवारी (दि. 21) योग शिबिर घेण्यात आले. यावेळी योगाची प्रात्यक्षिके घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी योग शिबिरात निगडी प्राधिकरणातील सुमारे 150 नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी योगाची प्रात्यक्षिके करुन जागतिक योग दिवस उत्साहात साजरा केला. योग प्रात्यक्षिकामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शैलजा मोरे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण जगाला योगाचे महत्व पटवून दिले. जगभरात आजच्या दिवशी योगाची प्रात्यक्षिके सादर केली जातात. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय या नात्याने आपण योग केलाच पाहिजे. हा योगा केवळ 21 जून पुरताच मर्यादीत न राहता दैनंदीन केला पाहिजे. तरच, पंतप्रधान मोदी यांच्या मनातला सशक्त भारत सत्यात उतरवण्यात आपल्याला यश येईल.त्याप्रसंगी श्री सलिम शिकलगार,श्री मनोज देशमुख, डॉ चिखलीकर ,जेष्ठ नागरिक,महिला भगिनी उपस्थित होत्या.














