न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- अज्ञात इसमाने अज्ञात कारणांसाठी कशाच्या तरी साहायाने फिर्यादीच्या पतीच्या डोक्याला मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करीत त्यांचा खुन केला आहे.
हा प्रकार (दि. १९ ते २१) ई स्क्वेअर बिल्डींग पाठीमागे असणा-या वॉल कंपाउंडलगत म्हसोबा मंदिराजवळ, रामनदी, बावधन येथे घडला.
महीला फिर्यादीने आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७४०/२०२३ भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.