न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- नवीन घेतलेले कपडे शाहुनगर येथे बदलुन मोशीकडे फिर्यादी व फिर्यादीचा मित्र त्यांच्या आय २० कारने घरी येत होते. दरम्यान स्कुटीला धक्का लागण्याच्या कारणावरुन आरोपी दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. आरोपींनी आणखी दोघांना बोलवून घेतले. त्या सर्वांनी मिळुन संगनमत करुन शिवीगाळ करुन फिर्यादी व मित्राला लाथाबुक्यानी व हाताने, बॅटने मारहान केली.
आरोपीने लोंखडी रॉड फिर्यादीच्या डोक्यावर मारुन फिर्यादीला गंभीर जखमी केले. तसेच ‘तु पोलीसांना सांग नाहीतर कोणालाही सांग, तुला मारुन टाकतो, इथे परत दिसला तर बघ अशी धमकी दिली. ही घटना (दि. २०) रोजी सांयकाळी ७.०० च्या सुमारास माउली भेळ कॉर्नर, बारणेवस्ती, लक्ष्मी रोड, मोशी येथे घडली.
फिर्यादी गणेश अंकुश फुगे यांनी आरोपी कल्पक बोराटे, सिध्देश रामाने, विनोद बोराटे, तन्मय बोराटे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २६४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३२४,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.















