न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- यु टयुब चॅनेल सबस्क्राईब करुन टास्क पुर्ण केल्यानंतर जास्त परतावा मिळेल, असे असे प्रलोभन फिर्यादीला दाखवले. फिर्यादीच्या बँक खात्यावरून आरोपीने वेगवेगळ्या खाते क्रमांकावर यु.पी.आय. अॅपद्वारे व नेट बँकीगद्वारे आतापर्यंत ७६,२४,२१३ रुपये एवढी रक्कम घेतली. फिर्यादीची मुळ रक्कम तसेच त्यावरील परतावा न देता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. १९/०५/२०२३ ते ०९/६/२०२३०) यु.पी.आय. अॅपद्वारे व नेट बँकीगद्वारे संभाजीनगर, मोशी येथे घडली. फिर्यादी शशिकांत नागनाथ पाटील यांनी आरोपी मोबाईल नंबर ९७३२९२८९५८ धारक मुलगी नामे सान्वी नाव, टेलीग्राम आय. डी. नं ३९४५१९३७ धारक मुलगी ज्योती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी २६६ / २०२३ भा.दं.वि. कलम ४१९, ४२०,३४ महिती व तंत्रज्ञान अधिनयम कलक ६६ (क) (ड) प्रमाणे दोघींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












