न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- कंपनीचे व्हिडीओ लाईक व शेअर केल्यास त्या बदल्यात पैसे मिळतील, असे अमिष दाखवून फिर्यादीला अगोदर अल्प परतावा दिला. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यानंतर टेलिग्रामवर वेळोवेळी संपर्क केला. प्रिपेड टास्क देवुन टास्कची पुर्तता करताना काहीतरी चुक झाली आहे, ती दुरुस्त, क्रेडिट स्कोअर अपडेट, व्हि.आ.पी. कस्टमर अपग्रेशन, खाते अॅक्टिव्ह करण्यासाठी जर पैसे भरले नाहीत तर अगोदरचे पण पैसे बुडतील, अशी भिती दाखवली.
विविध बँक खाते व यु.पी.आय. आयडी यामध्ये एकुण ८७,८४,७३३ रुपये ऑनलाईन भरायला भाग पाडले. त्यानंतर संपर्क बंद करुन पैसे परत न करता आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २४/०४/२०२३ ते दि. २०/०५/२०२३) पलाश को. ऑप. हौसिंग सोसायटी, मॅक्सिमा सोसायटी समोर, दत्त मंदिररोड, वाकड याठिकाणी घडली.
महीला फिर्यादीने आरोपी ६२८९५४२५७८६९०० या मोबाईल नंबर धारक युनायटेड ह्युमन रिसर्च, डिपार्टमेंन्टचा एच. आर. बेला च्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ५९०/२०२३ भा.द.वि. कलम ४२०, ४०६,४१७, ४१९ व माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००८ चे कलम ६६ (सी) (डी) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.