न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत मामुर्डीजवळ सिद्धार्थनगर ही ३० ते ४० घरांची लोकवस्ती सिद्धार्थनगर या नावाने वसली आहे.
या वस्तीमधील रहिवाशांना अचानक मिलिटरी कमांडकडून नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे. कॅन्टोन्मेंट ऑफिसमध्ये गेले असता ही मिलिटरी कमांडची नोटीस आहे, असे त्यांना सांगण्यात आले.
देहूरोड ते सांगवडे दरम्यान सिद्धार्थनगर नावाची वस्ती आहे. तीस वर्षांपूर्वी काही कुटुंबे येथे राहण्यास आली होती. नंतर ते येथेच स्थायिक झाले. नंतर हा भाग पिंपरी चिंचवड महापालिकेत गेला.
या झोपडपट्टीला टॅक्स पावती पाण्याचे बिल, कचरा उचलणे, एवढेच नव्हे, तर अंगणवाडी देखील महापालिकेची आहे. येथे काही दिवसांपासून काही व्यावसायिक बिल्डर जागेवर मालकी हक्क सांगत आहेत. त्यानंतर आता लष्कराने नोटीस दिल्याने येथील रहिवाशी गोंधळून गेले आहेत.














