न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- रेल्वेच्या वतीने लोणावळा रेल्वे स्थानकादरम्यान अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारच्या लोणावळा व पुण्याहून सुटणाऱ्या दोन लोकल रेल्वे गाड्या २६ ते २९ जून दरम्यान लोणावळा स्थानकावरून सुटणाऱ्या दुपारच्या सत्रातील दोन, पुण्याहून सुटणाऱ्या दोन लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, रेल्वेकडून तसे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
लोणावळाहून दुपारी २.५० व ३.३० वाजता पुण्याकडे सुटणारी व पुण्याहून लोणावळ्यास सकाळी ९.५७ व ११.१७ वाजता सुटणाऱ्या लोकल २९ जून पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या गैरसोयीत अधिक भर पडणार आहे.












