न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीतील दोघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तळेगाव परिसरात अटक केली असून बदल्याचा कट उधळून लावला आहे. आरोपीकडून चार पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना एक जुलै पर्यंत न्यायलयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. शरद साळवी याच्यावर हत्या, बलात्कार असे गुन्हे दाखल असून सांडभोरवर हत्या, हत्येचा प्रयत्न अशी एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमरीश देशमुख, पोलिस कर्मचारी सुमित देवकर, आशिष बनकर, गणेश सावंत, गणेश हिंगे, विनोद वीर, गणेश कोकणे आणि प्रवीण कांबळे यांच्या टीमने केली आहे.












