न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- पोलीस असल्याची बतावणी करून जबरी चोरी करणारे तसेच इंडस्ट्रीयल कंपनीमध्ये पार्टची चोरी करणारी टोळी पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलिसांनी जेरबंद केली असून ५ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वर्क शॉपच्या उघडया दरवाज्यावाटे प्रवेश करून आरोपी अज्ञाताने आतील २,१६,००० रुपये किंमतीचे प्लास्टिक १२ ट्रेची चोरी केली. ही घटना (दि. २०) रोजी ७.३० वाजेच्या सुमारास स्वालीटेअर इंजिनअर्स वर्कशॉप, कुदळवाडी, चिखलीत घडली. फिर्यादी श्रीपाद विठ्ठल पाटिल यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ४१२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दि. २९/०६/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोहाडे, महादेव जावळे, अजित रूपनवर असे पोलीस पथक चिखली पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पथकास माहिती मिळाली की,
चार जण चोरीचा माल घेवुन जाधववाडीत थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. जाधववाडी, राम मंदिर मैदान परीसरामध्ये सापळा लावुन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मंगेश युवराज कदम (वय २१ वर्षे, रा.से.नं.४. लांडगेवस्ती, भोसरी), अनिकेत उर्फ अनिल कैलास कदम (वय २३ वर्षे, रा. झपकेचाळ, ओमसाई किराणा स्टोअर्स जावळ, लांडगेवस्ती, भोसरी), समीर महमद रफीक इनामदार (वय २२ वर्षे, रा. शिंदे निवास, अंजलीनगर गल्ली क्रमांक ३. कात्रज), अभिजीत धनाजी खाडे (वय २१ वर्षे, रा. गणेश मंदिराचे समोर, भगतवस्ती, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहत. त्यांच्या ताब्यातील एक रिक्षामध्ये महिंद्रा कंपनीच्या गेअरचे १४४ जॉब, दोन दुचाकी मोटार सायकली, मोबाईल व एक आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, एटीएम कार्ड असा एकूण ५ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.
आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या मालाबाबत चिखली पोलिस ठाण्यात ४१२ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी यांनी कुदळवाडी परीसरामध्ये एका इसमास पोलीस असल्याचे सांगुन त्यास दमदाटी करून जबरदस्तीने चोरी करून ऐवज लुटला होता. त्याबाबत चिखली पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ४१३ / २०२३ भादवि कलम ३९२ १७० १७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपी यांना पुढील कारवाई कामी चिखली पोलीस ठाणेकड़े वर्ग करण्यात आले आहे.
आरोपी समीर महमद रफीक इनामदार याच्याविरुध्द राजगुरूनगर पोलीस ठाणे, गु.र.नं. १७७/२०१६ भादवि कलम ३०२ प्रमाणे पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये तो जामीनावर आहे. तसेच आरोपी नामे मंगेश युवराज कदम याचे विरूद्र भोसरी पोलीस ठाणे गु.र.नं. ५००/ २०२३ भादवि कलम ३८०, ४५७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये तो जामीनावर आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.
















