न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- पतीसोबत कामावरुन फिर्यादी या घरी आल्या होत्या. त्यावेळी फिर्यादीचा मुलगा व सह आरोपी यांची मुलगी हे लग्न करून दोघेही कोठेतरी निघुन गेले आहेत. आमची मुलगी कुठे आहे? अशी विचारणा आरोपीने फिर्यादीकडे केली. त्यावर फिर्यादी या आरोपींना ‘तुमची मुलगी कुठे गेली आहे, मला माहीत नाही व माझा मुलगा या ठिकाणी राहत नाही. तुमची मुलगी तुमच्या समोर गेली आहे, तुम्हाला माहीत असेल, आम्हाला त्याबद्दल काहीही माहीत नाही’, असे म्हणाल्या.
दरम्यान फिर्यादी घरात गेल्यावर आरोपी सर्वजण फिर्यादीच्या घरात शिरले. फिर्यादी व त्यांच्या पतीला हाताने मारायला सुरुवात केली. महिला आरोपीने फिर्यादी यांना त्यांच्या घरासमोर असलेल्या लोखंडी पट्टीने डाव्या हातावर व डाव्या मांडीवर मारले. त्यावेळी फिर्यादी यांची सासु भांडणे सोडवायला आल्या. त्यातील सह आरोपीने फिर्यादीच्या सासूचा उजवा हात पिरगाळुन त्यांना देखील मारहाण केली. ‘माझी मुलगी मिळाली नाहीतर तुला व तुझ्या पतीला बघुन घेतो’, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
महिला फिर्यादीने आरोपी संभाजी शेलार, रामचंद्र शेलार, महिला आरोपी, महिला आरोपी, एक अनोळखी महीला अशा पाच जणांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींवर ६१४/२०२३ भादवी कलम १४३, १४७,१४९, ३२४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















