न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- डांबरीकरण करण्यासाठी खोदाईचे काम चालु होते. त्यावेळी आरोपीने काम बंद करुन “तुम्ही सदर रस्त्याचे काम करायचे नाही, आम्ही सदर जागेचे मुळ मालक असुन, अजुन जागेवर माझ्या नावाचा सातबारा आहे,” असे म्हणत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करुन न देता सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३०/०६/२०२३) रोजी १२.३० च्या सुमारास सर्व्हे नं-४८/०१/०२/०३ -४८/०१/०२/१२- ४८/०१/०२/१३, पाषाण सुस उडडाणपुललगत, बाणेर येथे घडला.
फिर्यादी अजित अंकुश सणस कनिष्ठ अभियंता, बांधकाम विकास विभाग झोन क्र.३ पुणे महानगरपालिका यांनी आरोपी मधुकर मुसळे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीचं विरोधात ७६२ /२०२३ भा.दं.वी. कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















