न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- हिरो प्लेजर टु व्हीलरवरून कोकणे चौकातुन जात असताना डंपरवरील चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर हा वाहतूकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून दुचाकीला डंपरची धडक दिली.
फिर्यादीची ४१ वर्षीय पत्नी गाडीसह रस्त्यावर पडल्याने डंपरचे पुढील उजव्या बाजुचे चाक त्यांच्या डोक्यास व चेह-यास लागुन ते गंभीर जखमी होवुन अपघातामध्ये मयत झालेल्या आहेत.
हा प्रकार (दि. ३०/०६/२०२३) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास कोकणे चौकामध्ये, शिवार चौकाकडे जाणाऱ्या लेनवर, रहाटणी येथे घडला. फिर्यादी सतेंद्र शिवानंद रातुरी यांनी आरोपी भारत बेझ डंपरवरील आरोपी चालकच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ६१८ / २०२३ भादवि कलम २७९,३०४ (अ) मो. वा. का. कलम १८४, ११९/१७७, १३२ (१) (क) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















