न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- रूम भाडेतत्वावर चालविण्यास दिली नाही, याचा मनात राग धरून आरोपीने त्याच्या मित्रासह बिल्डींगमध्ये येवून ८ ते ९ रुमच्या खिडक्यांच्या काचा व संडासचे कमोड भांडे, वॉश बेसिंग भांडे, पाण्याच्या टाक्या व सोलर सिस्टम यांची कोयत्याच्या सहाय्याने तोडफोड करुन नुकसान केले आहे.
ही घटना (दि.२९/०६/२०२३) रोजी रारी ११.३० वाजता आंबी ता. मावळ जि पुणे येथील महालक्ष्मी बिल्डींगमध्ये घडली. फिर्यादी राजेंद्र प्यारालाल आर्या यांनी आरोपी शुभम शांतीलाल चव्हाण याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी १५०/२०२३ भादवि कलम ४४८ ४२७ ३४ आर्म अॅक्ट कलम ४ २५ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















