- विमानाचे तिकीट देण्याच्या नावाखाली आर्थिक गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- गोल्डन टुर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्स कंपनीव्दारे फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांना मक्का, सौदी अरब येथे तिर्थ यात्रेसाठी जाण्या-येण्यासाठी विमानाचे तिकीट देतो, असे सांगितले.
कुठल्याही प्रकारची बुकींग न करता घेतलेले ७,५०,००० रुपये परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे. ही घटना (दि. ०२/०७/२०२२ ते आज पावेतो) दरम्यान ए/२०, १३०३, स्प्लेंडर मेगा पोलीस हिंजवडी फेज ३ पुणे व पत्ता गाळा नं १,मालवणी नेहल बिल्डींग म्हाडा, मलाड वेस्ट मुंबई ४०००९५ येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी झाहीद मलिक, अमजद मलिक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७६१/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
















