- पिंपळे सौदागर परिसरात पसरली शोककळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात होरपळून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपरी- चिंचवडमधील मायलेकीसह सासूचा समावेश आहे. वनकर कुटुंब हे शहरातील पिंपळे सौदागर भागात राहते. संगणक अभियंते असलेले प्रणित वनकर यांच्या आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी नागपूरला गेल्या होत्या. ते नागपूरहून ट्रॅव्हल्स ने परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या दुःखद घटनेमुळे पिंपळे सौदागर परिसरात शोककळा पसरली आहे.
नागपूरवरून निघालेल्या ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की मृतांची ओळख पटविणे देखील कठीण झालेला आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील ट्रॅव्हल्समध्ये पिंपळे सौदागर येथे राहात असलेल्या वनकर कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. प्रणित वनकर हे संगणक अभियंते असून त्यांची आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी या नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. प्रणित वनकर देखील गेले होते. परंतु, ते गेल्या आठवड्यातच पुण्यात परत आले आणि आई, मुलगी आणि पत्नी ट्रॅव्हल्सने येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरावरती शोककळा पसरली आहे.

















