न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- चिखली जाधववाडी परीसरामध्ये गाडयांची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या टोळक्यास पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जाधववाडी, चिखली परीसरामध्ये (दि. ३०/०६/२०२३) रोजीच्या रात्री अनोळखी तीन इसमांनी पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड व कोयत्याने मारहाण, लुटमार करून परीसरामध्ये दहशत निर्माण केली होती. त्याबाबत चिखली पो.स्टे. येथे गु. रजि. नं. ४१७/२०२३ भादवि कलम ३०७,३९२.३२३, ५०६, ४२७.३४ माह का कलम ४ (२५) क्रि. लॉ. अॅ. १९१३ चे कलम ३/७ मु.पो.कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये नोंद करण्यात आला आहे.
सदर झालेली घटना ही गंभीर स्वरूपाची असल्याने गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देवुन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी योग्य त्या सुचना देवुन गुन्हे शाखा युनिट १ कडे असलेल्या स्टाफच्या दोन वेगवेगळ्या टिम तयार करून आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान पोलीस अंमलदार सोमनाथ बोहाडे, बाळु कोकाटे, महादेव जावळे, गणेश महाडिक, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये यांच्या पथकास गुन्हा करणारे तीन इसम हे चिखली, शिवरोड येथील जांभुळकर कॉर्नरला मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावुन थांबले असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार टिमने सापळा लावुन आरोपी आदर्श गौतम खंडारे (वय १९ वर्षे, रा. कॉलनी नगर ७, जांभुळकर कॉर्नर शेजारी, जाधववाडी, चिखली), दोन विधीसंघर्षित बालक यांना पकडुन त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास केला. त्यांनी चिखली, जाधववाडी परीसरामध्ये वाहनांची तोडफोड व कोयत्याने मारहाण करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी इसमाकडुन गुन्ह्यात वापरलेली ८०.००० ची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करण्यात आली असुन आरोपी व दोन विधीसंघर्षित बालक यांना पुढील कारवाई कामी चिखली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील विधीसंघर्षित बालकावर यापुर्वी चिखली, भोसरी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयातील तसेच यापुढे गाडया तोडफोड करणारे गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे). सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस अमलदार शिवाजी कानडे बाळासाहेबकोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, मनोजकुमार कमले फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, अजित रूपनवर, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांनी केली आहे.














