- उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने शोकसभेचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जूलै २०२३) :- समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागरमधील जरवरी सोसायटी येथील जेष्ठ नागरिक सदस्या कै. श्रीमती. शोभा वानकर आणि त्यांच्या सुनबाई व नात यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कार्यालयात त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभावी यासाठी ठीक सकाळी अकरा वाजता भावपूर्ण श्रद्धांजली आणि शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे,मा नगरसेवक शत्रुघ्न बापु काटे, पि के इंटरनॅशनल स्कुल चे संस्थापक जग्गनाथ काटे ,सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ भिसे, विठाई वाचनालयाचे सर्व सभासद व जरवरी सोसायटी मधील नागरिक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, वानकर कुटुंब हे शहरातील पिंपळे सौदागर भागात राहते. संगणक अभियंते असलेले प्रणित वनकर यांच्या आई, दोन वर्षीय मुलगी आणि पत्नी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभासाठी नागपूरला गेल्या होत्या. ते नागपूरहून ट्रॅव्हल्स ने परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. त्या सर्वांच्या मृतात्म्यास शांती लाभो. या दुःखद घटनेमुळे पिंपळे सौदागर परिसरावर शोककळा पसरली आहे.
















