न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जूलै २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ११ पोलीस अधिकारी व अंमलदार हे (दि. ३०) रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालयत करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील संभाजी शंकर राऊत, राजेंद्र शांताराम शेटे, रविंद्रकुमार पांडुरंग जाधव, पोपट दत्तात्रय गायकवाड, दत्ताराम पांगोजी घडशी, राजकुमार वासुदेव तांबे, अशोक ज्ञानेश्वर जाधव, विठ्ठल आबाजी शिंगे, राहुल मेनीनाथ वाघमारे, अरुण कृष्णाजीराव पालांडे, शांताराम तानाजी पाषाणकर या आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे आहेत.
आयोजीत कार्यक्रमात विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी नियतवयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा कुटुंबियासह शाल, श्रीफळ, पुष्पगुछ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र देवून सत्कार केला. तसेच त्यांच्या भावी आयुष्याकरिता व आरोग्या करिता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वंसत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) भास्कर डेरे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन लांडगे, राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने, मुख्यालयातील कर्मचारी वृदं व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार यांचे नातेवाईक उपस्थित होते.


















