- एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- पाचव्या मजल्यावरुन खाली पडुन मृत्य झाल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे अ.म.रजि नंबर ४०/२०२३ सीआरपीसी १७४ अन्वये गुन्हा दाखल आहे. या अकस्मात मृत्युच्या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत होते.
तपासावरुन पोलिसांना असे निष्पन्न झाले आहे की, तिघे आरोपी हे मयत मिथिलेश लंगोटे याच्या फ्लॅटमध्ये (दि. २१/०५/२०२३) रोजी सायंकाळी ५.५० च्या सुमारास दारु पित बसले होते. त्यावेळी झालेल्या भांडणातुन आरोपींनी मयताला मारहाण केली.
मारहाण करताना त्याला बचावासाठी घराबाहेर जावु दिले नाही. त्यामुळे मयत मिथिलेश लंगोटे हा घाबरून बचावासाठी त्याच्या फ्लॅटच्या गॅलरीतुन शेजारील फ्लॅटच्या गॅलरीत जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पाचव्या मजल्यावरुन खाली पडुन गंभीर जखमी होवुन मृत्युमुखी झाला आहे.
ही घटना कॉसमॉस सोसायटी, अनंतनगर, तुपेवस्ती, माशी येथे घडली होती. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी सागर दत्तात्रय गाढवे (वय २९ वर्ष रा. मोरे वस्ती चिखली), सुहास गयाभाऊ गाढवे (वय २३ वर्ष रा. सदर), मंगेश जालींदर वाळुंज (वय २६ वर्षे रा. सदर) यांना अटक केली आहे.















