- एकटी गाठून महिलेला धमकी अनं विनयभंग; आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- पाठीमागुन येवुन फिर्यादीचा रस्ता अडवुन त्यांना शिवीगाळ केली. ‘तु माझ्यावर टाकलेली मर्डर केस मागे घे, नाहीतर तुझ्या नव-याला जसे ठार मारले, तसे तुला व तुझ्या मुलांना ठार मारून टाकील’, अशी धमकी दिली.
तेव्हा फिर्यादी या आरडाओरडा करु लागल्या. म्हणुन त्याने फिर्यादी यांचे केस पकडुन हाताने मारहाण करुन फिर्यादी यांना त्याच्याजवळ ओढले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २) रोजी दुपारी ४.३० वाजता फिर्यादी यांच्या घराजवळ रसिकवाडी, जांबे, पुनावळे येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी मल्हारी व्यंकटेश केराळे (वय ३९ वर्षे, रा. सावरगाव, ता. लोहा, जि. नांदेड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपी ७६७ /२०२३ भा.दं.वि. कलम ३५४,३४१, ३२३, ५०४, ५०६ सह क्रि. लॉ अॅमेटमेंट ७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.















