न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- लोहगडावर रविवारी हजारो पर्यटक अडकून बसले होते. अक्षरशः पाऊल ठेवायला जागा देखील नसल्याचं एका व्हिडिओ मधून समोर आलेले आहे. सुदैवाने या घटनेत चेंगराचेंगरी झालेली नाही.
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे लोणावळा आणि मावळ परिसरामध्ये छोटे- मोठे धबधबे वाहू लागले आहेत. रविवारी वीकेंड असल्याने पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड यासह पुणे जिल्ह्यातील पर्यटक वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा, लोहगड, भाजे या ठिकाणी आल्याचे बघायला मिळालं.
लोहगडावरती प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होतं. पर्यटकांना बाहेर निघण्यासाठी जागा नव्हती. तब्बल चार तास पर्यटकांना अडकून बसावं लागलं अशी परिस्थिती गडावरती निर्माण झाली.














