न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- भक्ती शक्ती, निगडी ओटा स्किमजवळ से. २३ WTP ते कृष्णानगर एस-१-२ पंपिंगकडे जाणारी मुख्य जलवाहिनीत गळती सुरु झाली आहे.
गळती काढण्यासाठी से. २३ WTP वरून पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे संभाजीनगर, शाहूनगर, इतर भागात होणारा पाणीपुरवठा काम पुर्ण झाल्यानंतर कमी दाबाने, अनियमित, विस्कळीत होईल.
परिणामी दुसऱ्या दिवशी म्हणजे (दि. ४) रोजी देखील पाणी पुरवठा कमी दाबाने, अनियमित, विस्कळीत होईल. नागरीकांनी पाण्याचा जपुन वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


















