- गेल्या सात वर्षांपासून स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवडमधील गायकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड आयडॉल २०२३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस गेली ७ वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला व त्यातील काही स्पर्धकांनी ‘सूर नवा ध्यास नवा’,झी सारेगमप तसेच अशा अनेक स्पर्धांमध्ये गायक म्हणून पारितोषिक मिळविले आहे. या स्पर्धे मधील अनेक स्पर्धक व्यावसायिक रंगमंचावर गायक म्हणून नाव कमवीत आहेत.
दोन वर्षे कोव्हीड १९ या जागतिक महामारीमुळे या स्पर्धेमध्ये खंड पडला होता. तो तेवढा कालावधी वगळता स्पर्धा सन २०१४ पासून अविरत सुरु आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्यामुळे नवोदित कलाकारांना उर्जा मिळणार आहे.
या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड आयडॉल ‘मोरया करंडक’ चे हे यशस्वी ८ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे स्पर्धा दिमाखात आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे फॉर्म सर्व्हे नं.१६४ “मनिषा स्मृती निवास” भोईर नगर चिंचवड येथे उपलब्ध असून फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख बुधवार ०५ जुलै २०२३ (वेळ सकाळी १० ते सायं ५.०० वा.) आहे. स्पर्धेचा वयोगट १५ ते ३५ वर्षे असा आहे.















