- कुंडमळ्यात पोलिसांनी लावले सुरक्षिततेचे फलक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जुलै २०२३) :- इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने कुंडमळा येथे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याकडून सुरक्षिततेचे फलक लावण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली.
इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेलारवाडी परिसरामध्ये असलेल्या कुंडमळा ठिकाणी मागील वर्षी काही वर्षांत पाण्यात पोहताना आणि सेल्फी काढताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे परिसरात सुरक्षिततेचे फलक लावले आहेत.
तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंडमळा शेलारवाडी येथे इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तेथील नागरिकांना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याकडून धोक्याच्या सूचनाबाबत तसेच इतर सूचनांचे बॅनर पोलिस उपनिरीक्षक मारुती मदेवार, बाबाराजे मुंडे, प्रशांत वाबळे, किसन कोळप यांनी लावले आहेत.
काही अती उत्साही तरुणांमुळे परिसरामध्ये दुर्घटना झाल्या आहेत. त्या पुन्हा होऊ नये, यासाठी पोलिस कर्मचारी ठेवण्यात येणार आहेत. तसेच, परिसरात सूचना फलकही लावले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली












