- रहाटणीतून पोलिसांनी केली एकाची उचलबांगडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- सफारी गाडी फिर्यादीसह इतर दोघांच्या ट्रकला आडवी लावुन त्यांचा ट्रक थांबविला. आरोपीने तिघांना शिवीगाळ केली. आरोपीने हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तो चुकवल्याने तो त्यांच्या ट्रकच्या आरश्याला लागून ट्रकचे नुकसान झाले.
‘मी सुरेश बनसोडे आहे, भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट संघटनेचा अध्यक्ष, तुम्ही माझ्या एरीयामधुन मला पैसे न देता माल कसा घेवुन जाणार’ असे म्हणत आरोपीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर फिर्यादी हे आरोपीला ‘माझ्याकडे फक्त १००० रुपये आहेत. प्रवासामध्ये ते आम्हाला लागतील’ असे म्हणाले. आरोपीने बळजबरीने ते पैसे घेवुन स्वतःच्या खिश्यात ठेवून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास एम्पायर इस्टेटच्या पुलाजवळील स्पीडब्रेकरवर, ज्योतीबानगर, काळेवाडी या ठिकाणी घडला. फिर्यादी सागर काकासा मारनुर (वय २५ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. अभिसेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापुर) यांनी आरोपी सुरेश बाबुराव बनसोडे (रा. आकाशगंगा सोसायटी जवळ, रहाटणी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ६३४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२.३८५, ३४१, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.