न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आदेशाचा भंग करीत शहरात आला. त्याने स्वतःजवळ बेकायदा धारदार लोखंडी कोयता जवळ बाळगला.
पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनला याबाबत कुणकुण लागली. आरोपीला (दि. ४) रोजी रात्री ९.१० च्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथून ताब्यात घेतले. निगडी पोलीस ठाण्यात आरोपीवर ३९७/२०२३ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रोहीत चंद्रकात मुद्दे (वय २४, रा. आंबेडकरनगर, कुंदन होंडाई शोरूम समोर, थरमॅक्स चौक, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.