न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- भोसरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मतदान अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षकांना भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मार्गदर्शन तसेच, प्रशिक्षण देण्यात आले. मतदार नोंदणी अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी मार्गदर्शन केले.
निवडणूक आयोगाकडून नवीन बीएलओ अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामध्ये बीएलओची माहिती भरण्यात येणार आहे. वोटर हेल्पलाइन हे अॅप्लिकेशन मतदारांनी डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन रेवणनाथ लबडे यांनी केले आहे. अॅपचा कश्याप्रकारे वापर करावा याबाबत माहिती देण्यात आली.
आयोगाच्या वतीने २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीमध्ये नागरिकांनी नवीन मतदारयादीत नाव नोंदणी, नाव वगळणे, मतदार यादीतील नोंद दुरूस्ती आदी करता येणार आहे. तसेच, १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी माहिती कालावधीत आपले नाव या मतदारयादीत नोंदवावे, असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.












