न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जुलै २०२३) :- देहूरोड राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असून, ४० पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर, विद्यमान अघक्ष अॅड. प्रवीण झेंडे आणि इतर कार्यकर्ते तटस्थ राहिले आहेत.
यासंदर्भात देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिकी कोचर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी बॉबी डीक्का, कैलास गोरवे, रफीक शेख, रेणु रेड्डी, किशोर जगताप, गणेश कोळी, सुरेश भारस्कर, गोविंद राऊत, महेश केदारी, अन्थोनी स्वामी, सविता जाधव उपस्थित होते. आम्ही आतापर्यंत शरद पवार यांच्या बरोबर होतो. यापुढेही राहणार आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे.












