- पाच जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- मंच्युरियन खाताना दोन दुचाकीवर आरोपीसह दोन विधीसंघर्षित ४ बालक आले. त्यातील सह आरोपी हा फिर्यादीला पकडुन ‘तु आरोपींच्या मध्ये का पडतोस’, असे म्हणाला. त्यावेळी विधीसंघर्षित बालक सह आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर, गुडघ्यावर, उजव्या पायावर सपासप वार केले.
तसेच विधीसंघर्षित सह आरोपीने त्याच्या हातातील रॉडने व सह आरोपी विधीसंघर्षितने त्याच्या हातातील बांबुने फिर्यादीला पायावर, पाठीवर मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीस सोडविण्यासाठी आलेला त्यांच्या मित्राला सह आरोपींनी रॉडने व बांबुने मारहाण करुन गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हि घटना (दि. ४) रोजी रात्री १०.३० वाजता टेस्टी बाईट मंचुरिअन गाडीसमोर, कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली.
फिर्यादी शिरिष विनायक गायकवाड (वय २१ वर्षे, रा. गणेशनगर, नवी सांगवी याने आरोपी चार विधीसंघर्षित बालक, हुसेन इनाम शेख (वय १९ वर्षे, रा. बाणेर, लिंक रोड, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ३१५/२०२३, भा.द.वि. कलम ३०७, ३२४, ५०७, ३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) (२७), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.