न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- पतीच्या घरी नांदत असताना आरोपी पतीने फिर्यादीच्या मुलीला माहेरून पैसे व मोटारसायकल तसेच नोकरीचा एक वर्षापासुनचा पगार घेवून ये, असा सारखा तगादा लावला.
तिचा मानसिक व शारिरीक छळ करून शिवीगाळ व हाताने मारहाण केली. पतीच्या सर्व त्रासाला कंटाळुन फिर्यादीची मुलगी आरोपीच्या पत्नीने लग्नाच्या दिडच महिन्यात इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. हा प्रकार (दि. १७/०५/२०२३ पासुन दि. ०३/०७/२०२३ पर्यंत) तळेगाव दाभाडेमधील यशवंतनगर येथे घडला.
महीला फिर्यादीने आरोपी कौशल पिराजी भोसले याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १५४/२०२३ भादवि कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.