- प्रमोद सांडभोर टोळीतील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिलेले होते. त्यानुसार मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या भावाच्या खुनाच्या प्रयत्नात असलेल्या प्रमोद सांडभोर टोळीतील ५ आरोपींना पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून ७ पिस्टल व २१ राऊंण्ड जप्त करून आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सराईत आरोपी टोळी प्रमुख प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३ वर्षे, रा तळेगाव स्टेशन जवळ, तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवी (वय ३० वर्षे, रा. काळेवाडी, मुळ रा महारवाडा, अवहातरबाला, बदनापुर, जालना), अमित जयप्रकाश परदेशी (वय ३१ वर्षे रा. तळेगांव दाभाडे), मंगेश भिमराव मोरे (वय ३० वर्ष रा. माळीनगर वडगाव मावळ), अनिल वसंत पवार (वय ३९ वर्षे, रा. सिध्दार्थनगर, इंद्रायणी कॉलेज शेजारी तळेगाव दाभाडे), अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय २८ वर्ष रा. सिद्धार्थनगर तळेगाव दाभाडे), देवराज (रा. जळगाव जामोद), अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस नाईक १४५८ आशिष बनकर व पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर यांना मयत किशोर आवांरेंच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी एकावर हल्ला करण्याचा आरोपींनी कट रचला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी (दि. २५/०६/२०२३) रोजी रात्री ८. १५ वा दरम्यान तळेगाव दाभाडे एस टी बस स्टॅण्ड परिसरातुन सराईत आरोपी आणि टोळी प्रमुखाला ताब्यात घेतले. आरोपींकडून १,६०,००० रुपये किंमतीचे ४ गावठी पिस्टल, ७,००० रुपये किंमतीचे १४ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले. याबाबत तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २९५/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५). भा.द.वि.क. ३४ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा हे करीत आहेत.
गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील आरोपींकडे केलेल्या तपासादरम्यान एकुण ०७ पिस्टल व २१ जिवंत काडतुसे (राऊंण्ड). एक लोखंडी कोयता व एक लोखडी तलवार असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खून खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवुन गाडयांची तोडफोड करुन जाळपोळ करणे व बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र जवळ बाळगणे असे एकुण २६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, अहमदनगर जिल्हयाचे अभिलेखावर दाखल असल्याने तसेच वरील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीत करुन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द दि. ०४/०७/२०२३ रोजी मा. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड हे करीत आहे.
सन २०२३ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ११ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १३९ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत कारवाई केलेली आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनय कुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे, पोलीस सह आयुक्त, मा. श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं. चिं. मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चि. मा. काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त परि-२ पिं चि. मा. श्री सतिश माने साो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. मा श्री बाळासाहेब कोपनर साो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं., यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, बाळकृष्ण सावंत वपोनि (पीसीबी) गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर सुमित देवकर, सागर शेडगे, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे.